
मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या मोबाईल ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिल्यानंतर आता जिओ फायबरच्या ग्राहकांना आता मोफत ब्रॉडबॅंड सेवा मिळणार नाही. नवीन युजर्सकडून ब्रॉडबॅंड सेवेसाठी शुल्क आकारण्यास जिओने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर जुन्या ग्राहकांना देखील कपंनी ब्रॉडबॅंड सेवेसाठी रिचार्ज करा किंवा पेमेंट करा अशा सुचना पाठवत आहे. कंपनीकडून हे पाऊल अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने उचललण्यात आले आहे.
२५०० रुपयांची अमानत रक्कम देशातील मोठ्या शहरांतील जिओ फायबर वापरणाऱ्या ग्राहकांनी जमा केली होती. असे असून देखील आता अधिकचे सेवा शुल्क त्यांच्याकडून आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर देशभरात जिओ फायबरच्या युजर्ससाठी येणाऱ्या काही दिवसांत व्यावसायिक बिलिंग सुरू करण्यात येणार आहे.
ही सेवा सब्सक्राइब केलेल्या तब्बल पाच लाख जिओ फायबरच्या ट्रायल ग्राहकांना जिओ फायबर बाजारात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वी कंपनीकडून आता टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करण्यात येणार आहे. पुढच्या एक महिन्यात ही प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे. लवकरच ‘मोफत ब्रॉडबॅंड सेवा बंद होणार असून जिओ फायबरच्या प्लॅन्सला या सेवेचे लाभ घेण्यासाठी सब्सक्राइब करा, अशी सुचना कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.
६९९ रुपयांपासून जिओ फायबरच्या टॅरिफ प्लॅनची सुरुवात होते. हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे तर सर्वात महाग प्लॅन हा ८,४९९ रुपयांचा आहे. युजर्संना या प्लॅन्सच्या माध्यमातून 100 mbps ते 1 Gbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. गेमिंग, होम नेटवर्क शेअरिंग, टीव्ही विडियो कॉलिग आणि कॉन्फ्रेसिंगसोबतच डिवाइस सिक्यॉरिटी, ओटीटी कॉन्टेंट इत्यादी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.