इन्स्टाग्रामवर नवीन अकाऊंट सुरू करताना संबंधित युजरला त्याचे वय १३ वर्षे आहे हे स्पष्ट करावे लागणार आहे. वयाची 13 वर्ष पुर्ण असणाऱ्या युजर्संनाच आता इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येईल. त्यापेक्षा वय कमी असेल तर इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार नाही.

 

एका ब्लॉगमध्ये इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती युजरकडून मागविल्यामुळे लहान मुलांना इन्स्टाग्रामपासून दूर ठेवणे शक्य होईल. यामुळे लहान मुले अधिक सुरक्षित राहतील आणि वयानुरूप इतरांना इन्स्टाग्रामचा वापर करता येईल.

 

इतर युजर इन्स्टाग्रामवरील आपल्या वयासंबंधीची माहिती बघू शकणार नाहीत. पण आपल्या वयाबद्दल युजरने खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर त्यावर कसे नियंत्रण ठेवणार हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. अनेकजण सोशल मीडियावर चुकीची माहिती देतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे इंस्टाग्रामसमोर एक प्रकारचे आव्हानच आहे.

 

Find out more: