स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. या सायकलचे नाव Qicycle Electric असे आहे. ही सेंकड जनरेशन सायकल आहे, त्यामुळे परफॉर्मेंस आणि लूकमध्ये अधिक शानदार आहे. या सायकलची किंमत 2999 युआन (जवळपास 30 हजार रुपये) आहे. शाओमीची ही इलेक्ट्रिक सायकलचा लूक सर्वसाधारण सायकल प्रमाणेच आहे. याच्या हँडलबारच्या मध्यभागी एक लाइट-सेसेंटिव्ह डिस्प्ले आहे. यामध्ये गिअर, स्पीड, बॅटरी पॉवर, लाइट्स आणि चार्जिंग करताना बॅटरी पॉवर किती आहे याची माहिती दिसते.

 

सायकलमध्ये देण्यात आलेल्या डिस्प्लेमध्ये लाइट-सेंसिग क्षमता आहे. ज्यामुळे रात्री लाइट आपोआप कमी होते. या सायकलमध्ये प्यूर पेडल, बूस्ट आणि इलेक्ट्रिक असे तीन रायडिंग मोड आहेत. सायकलच्या डाव्या बाजूला पॉवर स्विच, हॉर्न बटन आणि हाय-ग्लो गिअर स्विच देण्यात आले आहे. हँडलच्या उजव्या बाजूला एक रोटरी थ्रोटल स्विच आहे. ज्याचा वापर सायकलला इलेक्ट्रिक मोडमध्ये चालवण्यासाठी केला जातो. शाओमीच्या या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 5.2Ah लिथियम बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 40 किमी बॅटरी लाईफ देते. इलेक्ट्रिक मोडमध्ये सायकलचा वेग ताशी 25 किमी आहे. याची बॅटरी साडेतीन तासात फूल चार्ज होईल.

 

नवीन सायकलमध्ये फ्रंटला कॅलिपर ब्रेक देण्यात आलेला आहे. सायकलचा वेग ताशी 20 किमी असताना अचानक ब्रे दाबल्यास ब्रेकिंग डिस्टेंस जवळपास 3 मीटर असेल. सायकलमध्ये हाय-ब्रायटनेस एलईडी लाईट आणि रेड वॉर्निंग लाईट देण्यात आली आहे, जी ब्रेक दाबल्यावर लागते. ही इलेक्ट्रिक सायकल सुरूवातीला चीनच्या बाजारात उपलब्ध असेल.

Find out more: