अमेरिकन टेक्नोलॉजी कंपनी गार्मीनने भारतात दोन नवीन स्मार्टवॉच ‘वेन्यू’ आणि ‘व्हिवोएक्टिव्ह 4’ लाँच केले आहेत. हे कंपनीचे पहिले स्मार्टवॉट आहे ज्यात, Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे. या घड्याळाची खास गोष्ट म्हणजे यात 1000 गाणे स्टोर करता येतील. याशिवाय हे घड्याळ तुमच्यामध्य किती ‘एनर्जी’ शिल्लक आहे, याची माहिती देईल. या फीचरला कंपनीने ‘बॉडी बॅटरी’ असे नाव दिले आहे.
कंपनीने Venu आणि Vivoactive 4 स्मार्टवॉचमध्ये वर्कआउट करणाऱ्यांसाठी खास ‘गार्मीन कोच’ हे फीचर दिले आहे. यामध्ये व्यायाम, योगा, कार्डिओसाठी वेगवेगळ 40 एनिमेशन देण्यात आलेले आहेत. याद्वारे समजते की, व्यायाम कसा करायचा आहे.
या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये 1.2 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. या वॉच 24 तास हेल्थ मॉनिटर करतात. युजर्सच्या झोपेपासून ते हार्ट रेट, स्ट्रेल लेव्हल, हायड्रेशन आणि महिलांच्या मेन्स्ट्रुअल सायकल देखील ट्रॅक करते. स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यास यात इनकमिंग कॉल, टेक्स्ट मेसेज, सोशल मीडिया अपडेट्स आणि कॅलेंडर नॉटिफिकेशन मिळेल.
कंपनीने दावा केला आहे की, याच 5 दिवस बॅटरी लाईफ मिळेल. याशिवाय अँड्राईड आणि आयफोन दोन्ही स्मार्टफोनला ही वॉच कनेक्ट होईल. गार्मीन वेन्यू स्मार्टवॉचची किंमत 37,490 रुपये आणि व्हिवोएक्टिव 4 ची किंमत 32,590 रुपये आहे. 15 डिसेंबरपासून अमेझॉन आणि ऑफलाइन स्टोरवरून या दोन्ही स्मार्टवॉच खरेदी करता येतील.