टेक कंपनी एलजीने जी सीरिज अंतर्गत एलजी8एक्स थिनक्यू (LG G8X ThinQ) फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या डिव्हाईसमध्ये फोल्डेबल स्क्रीन, जबरदस्त कॅमेरा आणि प्रोसेसर मिळेल. एलजी या फोनसह सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि ह्युवाईच्या मेट एक्सला टक्कर देईल. जी8एक्स थिनक्यूच्या किंमतीबद्दल सांगायचे तर या फोनची किंमत 49,999 रुपये आहे. या फोनची विक्री 21 डिसेंबरपासून सुरू होईल. ग्राहक हा फोन कंपनीच्या अधिकृत रिटेल आउटलेट्समधून खरेदी करू शकतात.
फोनच्या बाहेरील बाजूस 2.1 इंचचा मोनोक्रोम ओएलडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्यात वेळ, तारीख, नॉटिफिकेशन आणि बॅटरीची माहिती मिळेल. या फोनमध्ये 6.4 इंचचे दोन फूल व्हिजन डिस्प्ले मिळेल. डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळेल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. याशिवाय 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर रिअरला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एक कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. कॅमेऱ्याचा वापर अक्शन व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी देखील करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील. यूजर्सला या फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी मिळेल, जी क्विक चार्ज 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते.