गुगल आणि फेसबुकनंतर आता ट्विटरचा देखील डेटा लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कंपनीने आपल्या युजरला अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपुर्वीच कंपनीने हँकर्सकडून ट्विटर प्लॅटफॉर्मवर व्हायरस कोड टाकल्याची माहिती देण्यात आली होती. हॅकर्स मॅलिशस कोडद्वारे युजर्सचा डेटा चोरी करू शकतात.

 

हॅकर्स युजर्सच्या माहितीबरोबर ट्विट आणि मेसेज देखील करू शकतात. हॅकर्स युजर्सचे संपुर्ण अकाउंट कंट्रोल करू शकतात. ट्विटरने यावर म्हटले आहे की, अ‍ॅपमध्ये व्हायरससोबतच डेटा देखील एक्सेस केला जाऊ शकतो.

 

ट्विटरने म्हटले आहे की, अद्याप  डेटा लीक आणि चोरीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनीने सिक्यूरिटी पॅच जारी केला असून, युजर्सला अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

 

या व्हायरस कोडचा परिणाम आयओएस आणि वेब युजर्सवर पडणार नाही. मात्र अँड्राईड युजर्सच्या डेटाला यामुळे धोका आहे. म्हणून कंपनीने अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

Find out more: