आज लोक अँड्राईड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाईसचा वापर करतात. सर्वसाधारणपणे अँड्राईडच्या तुलनेत आयफोन अधिक सुरक्षित समजले जातात. कारण यात अधिक सुरक्षेचे फीचर्स असतात. मात्र एका रिपोर्टमध्ये आता समोर आले आहे की, आयफोन हॅक करण्याच्या पद्धती सर्वाधिक शोधण्यात आल्या आहेत. आयफोन हॅक होण्याची शक्यता 167 पट अधिक आहे.

 

रिपोर्टनुसार, आयफोन संबंधित हे आकडे गुगल सर्चवरून गोळा करण्यात आले आहेत. संशोधकांनी या आकड्यावरून सजण्याचा प्रयत्न केला की, लोक वेगवेगळ्या मोबाईलला हॅक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ‘आयफोन कसा हॅक करायचा’ हा कीवर्ड गुगलवर जवळपास 10,040 वेळा सर्च करण्यात आला. यावरून लक्षात येते की, हॅकर्स व्यतरिक्त लोक देखील आयफोन हॅक करण्याची पद्धत शोधत आहेत.

 

याव्यतरिक्त युजर्सनी ‘सॅमसंगचा फोन कसा हॅक’ करायचा हा कीवर्ड 700 वेळा सर्च केला. रिसर्चनुसार, लोकांनी अँड्राईड फोन हॅक करण्यामध्ये कमी रस दाखवला आहे. सॅमसंग आणि आयफोन सोडले तर इतर डिव्हाईसला हॅक करण्यासाठी महिन्याला 100 वेळा सर्च करण्यात आले. सोनीचा फोन हॅक करण्यासाठी 50 सर्च करण्यात आले.

Find out more: