जर तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये विंडोज 7 असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कप्युटर आणि लॅपटॉपसाठीचे अपडेट देणे मायक्रोसॉफ्ट कंपनीने आता बंद केले आहे. पण विंडोज 7 बंद करण्यामागे कंपनीने आता सध्या विंडोज 10 वर फोकस करण्याचे कारण पुढे केले आहे. विंडोज 7 मधील अपडेट 14 जानेवारी नंतर सपोर्ट करणे बंद होणार आहे. तुमचा पीसी अपडेट बंद झाल्यानंतर बंद होईल. कंपनी कोणतेही अपडेट देणार नसल्यामुळे वायरसचा अटॅक होणे सहज शक्य होणार आहे.

 

मायक्रोसॉक्टच्या सपोर्ट वेब पेज वरुन असे स्पष्ट झाले की, काही तांत्रिक कारणास्तव विंडोज 10वर अधिक फोकस केले जाणार असल्यामुळे विंडोज युजर्सला अधिक उत्तम अनुभव मिळणार आहे. कंपनीने त्यामुळे एका सुचनेच्या माध्यमातून असे सांगितले आहे की, जानेवारी 2020 संपण्यापूर्वीच विंडोज 10 डाऊनलोड करावे.

 

 

Find out more: