
अंतराळात एलियनचा शोध घेणाऱ्या नासाच्या एका विशेष विमानाच्या दुर्बिणने एक नवा ग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्ष लांब आहे. याचे नाव टीओआय700डी ठेवण्यात आले आहे. नवीन ग्रह पृथ्वीच्या तुलनेत 20 टक्के मोठा आहे. वैज्ञानिकांनी हा ग्रह मनुष्यासाठी राहण्यायोग्य असल्याचे सांगितले आहे. दावा करण्यात येत आहे की, यावर पाणी तरळ अवस्थेत आहे. या ग्रहाचा स्वतःचा सुर्य असून, ज्याच्या चारही बाजूला हा चक्कर मारतो.
या ग्रहाची कक्षा खूप छोटी असून, आपल्या सुर्याची परिक्रमा हा ग्रह केवळ 37 दिवसात करतो. त्यामुळे येथील एकवर्ष केवळ 37 दिवसांचे असते. टीओआय700 डी ग्रहाला पृथ्वीच्या तुलनेत केवळ 56 टक्के उर्जा प्राप्त होते. कारण याचा सुर्य आपल्या सौर मंडळातील सुर्याच्या वस्तूमानाच्या जवळपास 40 टक्के आहे आणि याच्या प्रकाशाची गरमी अर्धी आहे.
नासाचे एस्ट्रोफिजिक्स डिव्हिजनचे संचालक पॉल हर्टज यांच्यानुसार, स्पेसक्राफ्टच्या दुर्बिणीला राहण्यायोग्य झोनमध्ये 3 ग्रह दिसले. हे ग्रह टीओआय700बी, टीओआय700सी आणि टीओआई700डी हे आहेत. स्पेसक्राफ्ट टीईएसएसचे डिझाईन नवीन ग्रहांचा शोध आणि तेथे राहणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी करण्यात आले आहे.