वर्ष 2020 मध्ये इलेक्ट्रिक कारपासून ते अंतराळ मिशनपर्यंत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपुर्ण गोष्टी घडणार आहेत. यंदाच्या वर्षी अनेक नवीन गॅजेट देखील लाँच होणार आहे. अमेरिकेच्या लॉस वेगासमध्ये होणाऱ्या सीईएस 2020 या शोमध्ये अनेक हटके गॅजेट लाँच झाले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.
चार्मीन रोलबोट –
हा एक रोबॉट आहे. समजा तुम्ही बाथरूममध्ये असाल आणि तुम्हाला समजले की टॉयलेट पेपर संपले आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये हा रोबॉट तुमची मदत करेल. या रोबॉटला फोनद्वारे कमांड देता येतात.
डीएनएनड्ज (DnaNudge) –
स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँड्स सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. याच प्रमाणे डीएनए बँड लाँच झाला असून याला डीएनएनड्ज (DnaNudge) असे नाव देण्यात आले आहे. हे फिटनेस बँड तुमच्या आरोग्याप्रमाणे काय खाल्ले पाहिजे, ते सांगेल. हा बँड अॅपशी कनेक्ट असेल.
सॉस स्लाइडर (Sauce slider) –
सॉस स्लाइडर हे डिव्हाईस जेवणाच्या टेबलवर एका प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये सॉस देते. खास गोष्ट म्हणजे हे टेबलावर सॉस सांडवत नाही.
पेटिट कूबो (Petit Qoobo)
पेटिट कूबो एक शेपटी असणारा रोबॉट आहे. या रोबॉटची शेपटी मांजरी सारखी आहे. ज्या लोकांना प्राणी पाळायचे आहेत, मात्र एलर्जीमुळे पाळत नाही अशांसाठी हा रोबॉट आहे. हा रोबॉट हळूहळू वायब्रेट करतो व मिमिक्री देखील करतो. हा रोबॉट स्पर्श केल्यावर देखील शेपूट हलवतो. हा रोबॉट एवढा छोटा आहे की, तुम्ही त्याला पर्समध्ये देखील ठेऊ शकता. मात्र याला डोक नाहीये.
लूमी –
लूमी जगातील पहिला स्मार्ट बेबी केअर सिस्टम असून, याला पॅम्पर्सने सादर केले आहे. यामध्ये एक स्मार्ट एचडी मॉनिटर आहे, ज्यात अनेक सेंसर्स आहेत. हे सेंसर्च बाळाच्या हालचाली ट्रेस करते. या सिस्टमला एका अॅपने कनेक्ट करून पालक बाळावर 24 तास लक्ष ठेऊ शकतात.
वाय ब्रश –
हा एक स्मार्ट ब्रश असून, जो 10 सेंकदात तुमचे दात साफ करेल. याचा आकार वाय प्रमाणे आहे, त्यामुळे याला वाय ब्रश असे नाव देण्यात आले आहे. याला तोंडात लावून मोटार चालू करावी लागेल. दोनवेळी हा ब्रश दातांची चांगली सफाई करतो. याची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे.
सेरो –
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी सॅमसंगने एक नवीन टिव्ही सादर केला आहे. ज्याचे नाव सॅमसंग सेरो टिव्ही आहे. सॅमसंगचा हा टिव्ही पोट्रेट आणि लँडस्केप दोन्ही प्रकारे वापरता येतो. हा टिव्ही 43 इंच असून, यात 4के सपोर्ट आहे. जर तुम्ही सोशल मीडियावरील व्हिडीओ फोनवर पाहणे पसंद करत नसाल, तर हा टिव्ही तुमच्यासाठी योग्य आहे.
प्रिंकर –
प्रिंकर हा एक टॅटू प्रिंटर असून, ज्याच्या मदतीने तुम्ही विना त्रास सहन करता कोठेही आवडता टॅटू काढू शकता. ही मशीन कॉस्मेटिक ग्रेडच्या शाईचा वापर करते. मात्र याद्वारे तुम्ही केवळ काळ्या रंगाचा टॅटू काढू शकता. या मशीनला फोनला कनेक्ट करून तुम्ही कोणत्याही फोटोचा टॅटू काढू शकता.