मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून जनगणना केली जाणार आहे. एकूण दोन टप्प्यात जनगणना २०२१ करण्यात येणार आहे. १ एप्रिल ते ३० डिसेंबर पर्यंत पहिला टप्पा पार पडेल. ‘हाउसहोल्ड लिस्टिंग’ असे नाव या टप्प्याला देण्यात आले आहे. या टप्प्यांमध्ये घरातील मुख्य व्यक्ती कोण आहे? घरामध्ये कोणत्या सुविधा आहेत? किती व्यक्ती राहतात? असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
तर फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरा टप्पा पार पडले आहे. या टप्प्यामध्ये वैयक्तिक प्रश्न विचारले जातील. २०२१ जनगणनेत ज्या भागात पोहोचणे कठीण असेल अशा ठिकाणी शासकिय अधिकारी हेलिकॉप्टरद्वारे पोहोचतील. या मार्गाचा वापर २०११ साली देखील करण्यात आला होता. पण या पर्यायाचा यावेळी वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्पात ३० कर्मचारी जनगणना करण्याचे काम करतील. २०११ साली झालेल्या जनगणनेत एनपीआरला सोडून बाकी कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रूपयांचे मानधन देण्यात आले होते. परंतु यंदाच्या वर्षी हाऊसलिस्टिंग, जनगणनेचे काम आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला २५ हजार रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
तर, गृह मंत्रालयाअंतर्गत जनगणनेचे काम येते. यंदा डिजिटल जनगणनेचा डेटा नोंद करण्यासाठी मोबाईल वापरता येणार आहे. त्याचबरोबर हा डेटा कर्मचाऱ्याला जनगणना विभागाकडे मोबाइलवरूनच हस्तांतरित करता येईल. नव्या हायटेक पद्धतीने जनगणनेचे काम वेगवान आणि अधिक सखोल होईल, असे म्हटले जात आहे.