इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर आणत आहे. मात्र 1 फेब्रुवारीपासून जगभरातील जवळपास 75 लाख स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
1 फेब्रुवारी 2020 पासून लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करणार आहे. त्यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोन युजर्सला कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारी 2020 पर्यंत नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे.
1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप अँड्राईड व्हर्जन 2.3.7 आणि आयओएस 7 स्मार्टफोनवर काम करणे बंद करेल. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, त्यांच्या या निर्णयाचा परिणाम अधिक युजर्सवर होणार नाही. कारण अधिकतर युजर्स नवीन स्मार्टफोन्सचा वापर करतात.
कंपनीने म्हटले आहे की, अँड्राईडच्या किटकॅट म्हणजेच 4.0.3 व्हर्जन व त्यावरील व्हर्जन असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळेल. मात्र त्याखालील व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही.
या आधी कंपनीने नोकिया सॅबियन एस60 मध्ये 30 जून 2017, ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकरी 10 मध्ये 31 डिसेंबर 2017, नोकिया एस40 मध्ये 31 डिसेंबर 2018 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद केले आहे.