चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या रेडमी ए सीरिजमधील नवीन स्मार्टफोन ‘रेडमी 8ए ड्युअल’ लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. याचे डिझाईन रेडमी 8ए पेक्षा वेगळे आहे. हा फोन 2 व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आलेला आहे. याच्या 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आणि 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळेल.

 

या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. सोबतच वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आले आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आले आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर मिळेल. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील प्रायमेरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

 

रेडमी 8ए ड्युअलमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट 5000mAh बॅचरीसह सह यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लू, स्काय व्हाईट आणि मिडनाइट ग्रे रंगात उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑरा एक्सग्रिप डिझाईन दिले असून, याच्या बॅक पॅनेलमध्ये देखील टेक्सचर फिनिश पाहण्यास मिळेल.

 

कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि अमेझॉनवर फोनची विक्री 18 फेब्रुवारीपासून सुरू होईल. कंपनीने फोनसोबत 10W फास्ट चार्ज सपोर्ट करणारा 10,000mAh पॉवरबँक देखील लाँच केला आहे. याची किंमत 799 रुपये आहे. तर 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट 20,000mAh पॉवरबँकची किंमत 1,499 रुपये आहे.

 

Find out more: