चीनी टेक कंपनी शाओमी मागील काही दिवसांपासून भारतात आपले स्मार्ट होम इकोसिस्टम प्रोडक्ट्स भारतात लाँच करत आहे. आता कंपनीने एमआय इलेक्ट्रिक टूथब्रथ टी300 ला भारतात लाँच केले आहे. या टूथब्रशची किंमत 1,299 रुपये आहे.
शाओमीने एमआय क्राउडफंडिंगद्वारे या टूथब्रशला सादर केले आहे. जर कंपनीला 1000 टूथब्रशसाठी फंडिंग मिळाले तरच तुम्ही हा टूथब्रश खरेदी करू शकता. या टूथब्रशची डिलिव्हरी 10 मार्चपासून सुरू होईल.
कंपनीने दावा केला आहे की, या इलेक्ट्रिक टूथब्रशचा बॅटरी बॅकअप 25 दिवस असेल. याला पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आले आहे. टूथब्रथ आयपीएक्स7 वॉटर रेजिस्टेंट आहे. यामध्ये DuPont TyneX StaClean ब्रिस्टल्स देण्यात आलेले आहे. ज्याद्वारे दातांची सफाई व्यवस्थित करता येईल.
या टूथब्रशमध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन सोनिक मोटारचा वापर करण्यात आलेला आहे. जे 1 मिनिटात 31000 वेळा वायब्रेशन करते. या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये ड्यूअल प्रो ब्रश आणि इक्वी क्लिन ऑटो टायमर असे दोन वेगवेगळे मोड्स देखील मिळतील.
या इलेक्ट्रिक टूथब्रशला चार्ज देखील करता येणार आहे. यासाठी कंपनीने यूएसबी टाईप सी चार्जर दिले आहे. जे 5 वॉटवर चालते. म्हणजेच तुम्ही नॉर्मल स्मार्टफोन चार्जरद्वारे देखील ब्रश चार्ज करू शकता. या टूथब्रशचे हेड (वरील बाजू) वेगळी देखील खरेदी करता येईल. कंपनीने दावा केला आहे की, एक ब्रश हेड चार महिने सलग वापरता येईल. यासोबत कंपनी 1 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.