स्मार्टफोन कंपनी सोनीने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन ‘एक्सपेरिया एल4’ ला लाँच केले आहे. कंपनीने या स्मार्टफोनला एक्सपेरिया एल3चे अपग्रेड व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. या फोनमध्ये 3 रिअर कॅमेरे आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल.
यामध्ये कंपनीचे मल्टी-विंडो यूजर इंटरफेस मिळेल. जे सर्वात प्रथम कंपनीचा फ्लॅगशिप फोन एक्सपेरिया 1 मध्ये पाहायला मिळाले होते. कंपनीने हा फोन सर्वात प्रथम मागील वर्षी बार्सिलोना येथील वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला होता. हा फोन काळ्या आणि निळ्या रंगात ठराविक मार्केटमध्ये उपलब्ध होईल. सध्या कंपनीने या फोनच्या किंमतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
या ड्युअल नॅनो सिम सपोर्ट फोनमध्ये 6.2 इंच एचडी+ डिस्प्ले मिळेल, ज्याते रिजॉल्यूशन 1680×720 पिक्सल आहे. सोबतच डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच देखील मिळेल. यामध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक एमटी6762 प्रोसेसर आणि अँड्राईड 9 विथ मल्टी-विंडो यूआय ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेली आहे.
सोनी एक्सपेरिया एल4 स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंर्टनल स्टोरेज मिळेल. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येईल.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात तीन रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. ज्यातील प्रायमेरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तर इतर दोन कॅमेरे 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये 3580 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ व्हर्जन 5, जीपीएस, एनएससी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील.