चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमीने भारतीय बाजारात पहिला वहिला 5जी स्मार्टफोन ‘रिअलमी एक्स50 प्रो 5जी’ लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसोबत पॉवरफुल प्रोसेसर क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 865 मिळेल. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, हा फोन मोस ग्रीन आणि रस्ट रेड रंगात मिळेल.
रिअलमी एक्स50 प्रो 5जी फीचर्स आणि किंमत –
या फोनमध्ये 6.44 इंच सुपर एमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्याचे पिक्सल 1080×2400 पिक्सल आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोलिल्ला ग्लास 5 देखील मिळेल. फोन ड्युअल नॅनो सिम सपोर्ट असून, यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि रिअलमी UI बेस्ड अँड्रॉयड 10 मिळेल.
फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. याच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे.
रिअलमी एक्स50 प्रो स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय फाय 6 ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनमध्ये 4200 एमएएच बॅटरी आणि 65 वॉट फास्ट चार्जर मिळेल. कंपनीचा दावा आहे की फोन 35 मिनिटात 0 ते 100 टक्के चार्ज होईल. यासोबतच या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात ड्युअल म्यूझिक मोड मिळेल. याद्वारे एकसोबत वायर्ड आणि ब्लूटूथ अशा दोन हेडफोनद्वारे गाणी ऐकता येतील.