चीनी स्मार्टफोन कंपनी हुवाईने २६ मार्च रोजी पी ४० सिरीज लाँच करत असल्याची घोषणा केली असून पॅरीस मध्ये त्यासाठी एक इवेंट आयोजित केला आहे. या संदर्भातला एक टीझर कंपनीने जारी केला असून त्यात फोनची काही फिचर्स उघड केली गेली आहेत.
या टीझर आणि अन्य काही लिक माहितीनुसार पी ४० अतिशय उत्तम रिअर कॅमेरा सेटसह येत असून या फोनमध्ये पाच रिअर तर दोन फ्रंट कॅमेरे दिले जात आहेत. रीअरला मोठा कॅमेरा बंप दिला जात असून त्यात पाच कॅमेरे असतील असे समजते. शिवाय ड्युअल फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. पी ४० सिरीज मध्ये पी ४०, पी ४० प्रो आणि पी ४० प्रीमियम असे तीन फोन असतील.
कॅमेरासेटअप मध्ये ५२ एमपीचा सोनीचा प्रायमरी कॅमेरा, ४० एमपीचा अल्ट्रा वाईड सेन्सर, थ्री एक्स ऑप्टिकल झूम टेलीफोटो लेन्स, १० एक्स ऑप्टिकल झूम ड्युअल प्रिझम पेरीस्कोप लेन्स असेल व टाईम ऑफ फ्लाईट सेन्सर असेल. पी ४० प्रोसाठी ६.७ इंची अमोलेड स्क्रीन, चारी बाजू कर्व्हड, १२ जीबी रॅम, किरिन ९९० फाईव्ह जी सेटअप असेल असेही म्हटले गेले आहे.