
फ्रेंच स्टार्टअप कंपनी प्राग्मा इंडस्ट्रीजने पहिली हायड्रोजन फ्युल इलेक्ट्रिक सायकल अल्फा बाईक नावाने सादर केली आहे. कार्पोरेट तसेच नगरपालिका वाहन ताफ्यात या सायकली सध्या सामील केल्या गेल्या आहेत. प्राग्मा कंपनी लष्करासाठी फ्युल सेल बनविण्याचे काम करते. फ्रेंच नगरपालिकांनी कंपनीकडून ६० अल्फा बाईक विकत घेतल्या आहेत. या सायकलीची किंमत ७५०० युरो म्हणजे ६ लाख रुपये आहे.
कंपनीचे संस्थापक व सीईओ पायेरे फोर्ट म्हणाले या सायकलींच्या किमती घटविण्याचे आमचे प्रयत्न आहेत कारण बाजारातील अन्य सायकलीच्या तुलनेत हे दर जास्त आहेत. दर कमी झाले तर या सायकली प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात सामील होऊ शकणार आहेत. अन्य कंपन्यांकडे हायड्रोजन बाईक प्रोटोटाईप आहे पण आम्ही अशी सायकल तयार केली आहे. दोन लिटर हायड्रोजन मध्ये हि सायकल ६२ मैल म्हणजे १०० किमी जाते. तसेच ती अत्यंत कमी वेळात चार्ज होते.