तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे चॅटिंग आणखी सुरक्षित होणार असल्यामुळे आपण यापुढे निसंकोचपणे काही खाजगी संदेश पाठवू शकतात. गूगल प्ले स्टोअरमध्ये नुकत्याच आलेल्या एका अॅपच्या बीटा व्हर्जनमधून असे समोर आले आहे की, आपल्याले खाजगी चॅट हटविण्यासाठी व्हॉट्सअॅप स्वयंचलितपणे टाइमर सेट करण्यास अनुमती देईल, असे WABetaInfo जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

 

WABetaInfoच्या माहितीनुसार, ही सुविधा गेल्या ऑक्टोबरमध्ये केवळ ग्रुप मेसेजवर देण्यात आली होती. परंतु हा पर्याय आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपकडून पर्सनल चॅटिंगवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे आपण एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्षानंतर सेल्फ डिस्ट्रक्टसाठी मेसेजची सेटिंग करू शकता.

 

तथापि, ते फेसबुक मेसेंजर आणि टेलिग्रामवर उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा हा बराच वेगळा पर्याय असणार आहे. हा पर्याय अधिक सोपा आणि चांगला असेल अशी अपेक्षा आहे. हे फीचर यूजर्संना फोनमध्ये सेव्ह कॉन्टॅक्टसाठी वेगवेगळे प्रायव्हेट चॅट करण्याची परवानगी देते. संदेश किती काळ ठेवायचा यावर देखील आपले नियंत्रण असणार आहे. सध्या कोणत्याही एका मेसेजवर टाईमर लावण्यासाठी व्हॉट्सअॅपवर पर्याय नाही, पण हे फीचर लवकरच अधिकृतपणे उपलब्ध होईल आणि प्रत्येकजण त्याचा वापर करु शकतो.

 

हा संवेदनशील विषयांसाठी एक स्वागतार्ह पर्याय आहे. कारण लोकांना काहीवेळा खाजगी मेसेज पाठविण्यास भीती वाटते. त्यांना व्हॉट्सअॅप एन्क्रिप्शनवर देखील भरोसा नसतो. पण या नव्या पर्यायाच्या मदतीने असे होऊ शकते की, दुसर्‍या व्यक्तीला पाठवलेला खासगी मेसेज त्या व्यक्तीने वाचल्यानंतर, जर दुसर्‍याच्या कुणाच्या हातात त्या व्यक्तीचा फोन आला तर, ती व्यक्ती ते खाजगी मेसेज वाचू शकणार नाही. कारण तोपर्यंत तो मेसेज डिलीट झालेला असेल.

 

Find out more: