टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलने देखील कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर केले आहे. हे टूल अपोलो हॉस्पिटलद्वारे संचालित आहे.
हे टूल कंपनीच्या अधिकृत एअरटेल थँक्स अॅपमध्ये उपलब्ध आहे. हे टूल जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयावर आधारित आहे.
अपोलो हॉस्पिटलने देखील काही दिवसांपुर्वी हे टूल लाँच केले होते. टूल वापरण्यासाठी तुमच्या फोनमधील एअरटेल थॅक्स अॅप उघडा. येथे Buy पर्यायाखालील स्लाईडमध्ये India Fights COVID-19 Scan Your Fear Away हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील.
सर्व प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर तुम्हाला कोव्हिड रिस्क रिझल्ट दिसेल. या आधारावर तुम्हाला किती खबरदारी घेणे गरजेचे आहे, याची माहिती मिळेल. काही दिवसांपुर्वी जिओने देखील कोरोनाची लक्षण आणि माहिती जाणून घेण्यासाठी Coronavirus info & tool सादर केले आहे. जिओ अॅपमध्ये युजरला हे टूल मिळेल.