मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीने कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. रिलायन्सने नुकतेच एक नवे ‘MyJioApp’ लाँच केले आहे. तसेच या अॅपमध्ये ‘कोरोना विषाणू इन्फो अँड टूल’ जोडले आहे.
या माध्यमातून आता एका क्लिकवर तुम्हाला कोरोनाबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे. रिलायन्सचा हा अॅप आता रिलायन्सशिवाय इतर यूझर्सही वापरु शकणार आहेत. हा अॅप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला जिओचे ग्राहक असण्याची गरज नाही.
या इन्फो टूलसाठी MyJioApp च्या हॅमबर्गर मेन्यूवर जाऊन अॅक्सेस केला जाऊ शकतो. टूलवर क्लिक करताच तुम्हाला मेसेज दिसेल ज्यामध्ये कोरोना विषाणू या आजाराबद्दल माहिती दिली आहे.
टेस्ट सेंटर आणि हेल्पलाईन नंबर
या अॅपमधील नवीन फीचरमध्ये तुम्ही कोरोना आजाराची लक्षणं चेक करु शकता, टेस्ट सेंटर्सची यादी, रुग्णांची संख्या, हेल्पलाईन नंबर आणि FAQ सारखे अनेक ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत. या अॅपमध्ये देशात जिथे जिथे कोरोनाची तापसणी सुरु आहे अशा सर्व लॅबची यादी आणि पत्ता दिला आहे. तसेच हेल्पलाईन ऑप्शनवर क्लिक करुन यूझर्स हेल्पलाईन नंबरची यादीही पाहू शकतो.
या अॅपच्या माध्यमातून यूझर्स कोरोना संबंधित सर्व प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. भारतात कोरोना रुग्णांची संख्या किती, किती रुग्ण बरे झाले आणि आतापर्यंत किती रुग्णांचा मृत्यू झाला ही सर्व माहिती या अॅपवर मिळेल. ही संपूर्ण माहिती तज्ञ डॉक्टर आणि प्रशासनाद्वारे अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
दोन आठवड्यात 100 बेडचे सेंटर
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने फक्त दोन आठवड्यात मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 100 बेडचे एक सेंटर तयार केले आहे. जेथे कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातील.
याशिवाय रिलायन्स कंपनी दररोज एक लाख मास्क तयार करत आहे. कारण कोरोनाच्या पसरलेल्या आजारात गरजू लोकांना मास्क पोहोचलवले जातील. याशिवाय कंपनीकडून देशातील अनेक ठिकाणी मोफत जेवण वाटण्याची व्यवस्था केली आहे. जेणेकरुन फुटपाथ आणि गरीब लोक उपाशी राहणार नाहीत.
रिलायन्सकडून स्वत:चे ग्रॉसरी स्टोअर्स सरु करण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टोअर सुरु राहतील. देशातील सर्व 736 स्टोअरमध्ये अतिरीक्त सामान असेल. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याची गरज नाही. पण स्टोअर कधी सुरु करणार हे अद्याप कंपनीकडून निच्छित करण्यात आले नाही.