जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच पार्श्वभुमीवर टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि जागतिक आरोग्य संघटनेत महत्त्वपुर्ण करार झाला आहे. कोरोना व्हायरस संदर्भात संशोधन आणि डाटा एनालिसिससाठी मायक्रोसॉफ्ट जागतिक आरोग्य संघटनेस मदत करणार आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विट करत माहिती दिली.

 

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रँड स्मिथ या संदर्भात म्हणाले की, डाटा एनालिसिस आणि रिमोट लोकेशनवरून काम करण्याची सिस्टम व क्लाउडमध्ये मजबूत सायबर सुरक्षेसोबत आरोग्य संघटनेच्या कॉम्प्युटर डिव्हाईसला सायबर सुरक्षा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

 

सत्या नडेला यांनी देखील कोव्हिड-19 शी लढण्यासाठी कंपनी मदत करण्यास असल्याचे सांगितले.काही दिवसांपुर्वीच सत्या नडेला एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, त्यांना विश्वास आहे की कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा कंपनी मजबूतीने सामना करेल व या संकटातून बाहेर पडेल.

https://mobile.twitter.com/satyanadella/status/1243587458333204481?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1243587458333204481&ref_url=https%3A%2F%2Fwww.majhapaper.com%2F2020%2F03%2F28%2Fmicrosoft-signs-agreement-with-who-for-covid19%2F

Find out more: