
कोरोना व्हायरसमुळे एप्रिलपर्यंत संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व सेवा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये खाजगी कंपन्या देखील आपल्या सेवांमध्ये बदल करत आहेत. जेणकरून लोकांना मदत होईल.
डीटीएच कंपनी टाटा स्कायने आपल्या युजर्ससाठी या काळात एक खास ऑफर आणली आहे. याद्वारे टाटा स्कायचे युजर्स लोन ऑफरद्वारे 7 दिवस विना रिचार्ज टिव्ही पाहता येईल. यानंतर 8व्या दिवशी रिचार्ज केल्यानंतर 7 दिवसांचे पैसे कापले जातील.
ज्या युजर्सचे अकाउंट बंद झाले आहेत, अशांसाठी कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू न शकणारे युजर 080-61999922 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन 7 दिवस टिव्ही पाहू शकतात. याशिवाय टाटा स्कायने आपल्या फिटनेस वॅल्यू अॅडेड सेवेला देखील 21 दिवसांसाठी मोफत केले आहे.