जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरशी लढण्यासाठी प्रत्येक देश वेगवेगळी पावले उचलत आहेत. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. आता पुण्यातील स्टार्टअप कंपनी जेक्लीन वेदरने (JClean Weather Technologies) एक तंत्रज्ञान तयार केल्याचा दावा केला आहे. ज्याद्वारे कोरोनाने संक्रमित छोटी खोली आणि जागेला कोरोना व्हायरसपासून मुक्त करता येईल.
कंपनीने या तंत्रज्ञानाचे नाव Scitech Airon ठेवले आहे. या तंत्रज्ञानासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासोबत मिळून उच्च स्तरावर काम सुरू आहे. या तंत्रज्ञानाला निधी प्रयास प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात येत आहे.
कंपनीचा दावा आहे की या तंत्रज्ञानावर छोट्याशा जागेतील व्हायरस एका तासात 99.7 टक्के नष्ट होतील. या तंत्रज्ञानाचा वापर कोरोनाग्रस्त असलेल्या हॉस्पिटलला व्हायरस मुक्त करण्यासाठी देखील करता येईल
Scitech Airon ची चाचणी अनेक आंतरराष्ट्रीय लॅब, छोटी जागा, हॉस्पिटल, शाळा आणि कंपन्यांमध्ये झाली आहे. हे तंत्रज्ञान बॅक्टेरिया आणि व्हायरस मारण्यास सक्षम आहे. याशिवाय हे कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायोऑक्साइड सारख्या विषारी गॅसला नष्ट करण्यास देखील सक्षम आहे.
कंपनीला या तंत्रज्ञानासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून 1 कोटी रुपये मिळाले आहेत. कंपनीने दावा केला आहे की 1000 यूनिट्स तयार असून, लवकरच महाराष्ट्रातील विविध हॉस्पिटलमध्ये पाठवले जातील.