कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहे. आता यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वैज्ञानिकांनी 4 दिवसांच्या आत आधुनिक सी-पॅप मशीन तयार केली आहे. मशीन श्वास घेण्यास समस्या येत असणाऱ्या रुग्णाच्या मास्कमध्ये ऑक्सिजन आणि हवा भरेल.
जेणेकरून रुग्णाचे फुफ्फुस फुगेल आणि श्वासाच्या समस्येपासून आराम मिळेल. आयसीयू आणि वेंटिलेटर यूनिटमध्ये दिले जाते तसे रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी कोणतेही औषध द्यावे लागणार नाही.
ब्रिटनच्या मेडिसन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजेंसीने याला परवानगी दिली आहे. लवकरचा याचा प्रयोग यूनिवर्सिटीच्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर केले जाणार आहे.
यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे क्रिटिकल केअर विभागाचे प्रा. टीम बेकर यांनी सांगितले की, वेंटिलेटरचे प्रमाण मर्यादित आहे. या मशीनद्वारे पर्याप्त मात्रेत हवा सी-पॅप मशीन आणि मास्कद्वारे रुग्णाच्या फुफ्फुसापर्यंत पोहचवता येईल.
वैज्ञानिकांनी दावा केला आहे की क्लिनिकल ट्रायल पुर्ण झाल्यानंतर सात दिवसात 1 हजार मशीन बनवता येतील. जेथे वेंटिलेटर आणि आयसीयू कमी आहेत, तेथे या मशीनच्या उपयोगाने लोकांचे प्राण वाचवता येतील.क्रिटिकल केअर तज्ञ प्रा. मेरवीन सिंगर यांनी सांगितले की, वृद्धांसाठी ही मशीन एवढी फायदेशीर नाही. मात्र गरज पडल्यास त्यांच्यासाठी या मशीनचा वापर करता येईल.