लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत. मात्र घरून काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र तुम्ही जीमेलचे काही खास फीचरवापरून तुमची समस्या सोडवू शकता. आज आम्ही तुम्हाला जीमेलचे असे काही फीचर सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही वर्क फ्रॉम होमसाठी करू शकता.

स्नूझ ईमेल्स (Snooze Emails) –

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या ईमेलचे उत्तर द्यायचे नसेल तर तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. ज्या ईमेलला स्नूज करायचे आहे, त्यावर माउस नेल्यावर तुम्हाला एक गोलकार घड्याळाचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही वेळ ठरवू शकता.

स्मार्ट कंपोझ (Smart Compose) –

हे सजेस्टिव्ह टेक्सट रिस्पॉन्सचे आधुनिक व्हर्जन आहे. जेव्हा तुम्ही ईमेल टाइप करत असताना हे फीचर तुम्हाला वाक्य पुर्ण करण्यासाठी काही सूचना देईल. यासाठी तुम्हाला जीमेलच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर खाली Writing suggestions पर्याय सुरू करावा लागेल.

वेकशन रिस्पाँडर (Vacation Responder) –

तुम्ही ईमेल वापरू शकत नसाल, तेव्हा हे फीचर वापरू शकता. फीचर सुरू करण्यासाठी जीमेलच्या सेटिंग्समध्ये जावे. त्यानंतर खाली तुम्हाला Vacation Responder हा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला डेट रेंज, विषय आणि मेसेज लिहावा लागेल.

शेड्यूल सेंड (Schedule Send) –

तुम्ही वेगवेगळ्या टाईम झोनसाठी काम करत असाल तर हे फीचर फायदेशीर आहे. ज्याला ईमेल करायचा आहे त्या मेलला टाइप करून तुम्ही शेड्यूल सेंडवर क्लिक करू शकता. येथे तुम्हाला तारीख व वेळ देखील निवडू शकता.

Find out more: