मस्त फिचर्स असलेला एक देखणा स्मार्टफोन चीनी लग्झुरीयस ब्रांड ८८४८ ने बाजारात आणला असून या फोनचे नाव आहे टायटेनियम एम ६ फाईव्ह जी. या फोनची ११ व्हेरीयंट चीनी बाजारात आली असून सुरवातीच्या व्हेरीयंटची किंमत १२९९९ युआन म्हणजे १.३९ लाख रुपये तर टॉप व्हेरियंटची किंमत २९९९९ युआन म्हणजे ३.२१ लाख रुपये आहे. सध्या हा फोन फक्त चीन मध्येच सादर केला गेला आहे.
या फोनला दोन स्क्रीन दिले गेले आहेत. फ्रंट स्क्रीन ६ इंची असून रिअरला १.१९ इंची दुसरा स्क्रीन दिला गेला आहे. टॉप व्हेरीयंट साठी १२ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज दिले गेले आहे. टायटेनियम अॅलॉय व लेदर व्हेरीयंट आहे. फोनला रिअरला तीन कॅमेरे आहेत त्यातील मेन कॅमेरा १०० एमपीचा असून ४ के व्हिडीऑ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे.
सेल्फी साठीच्या कॅमेऱ्याला वायफाय ६ सपोर्ट आहे. एलपीडीडीआरएस टाईप हाय स्पीड रॅम, युएफएस ३.० फास्ट इंटरनल स्टोरेजसह दिले गेले आहे. फोनची बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे.