कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहेत. डिलिव्हरी सर्व्हिसेज देखील काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा डिलिव्हरीद्वारे मागवण्यासाठी गुगल मॅप्सने खास फीचर युजर्ससाठी आणले आहे.


गुगल मॅप्सवर युजर्सला आजुबाजूच्या मार्केटचे टेकवे (Takeaway) आणि डिलिव्हरी (Delivery) फीचर दिसत आहे. याच्या मदतीने युजर सहज फूड ऑर्डर करू शकतात.

 

मॅप्स उघडल्यावर रेस्टोरेंट, गॅस स्टेशन्स आणि कॉफी शॉप्सप्रमाणेच हे फीचर युजर्सला सर्च बारच्या खाली दिसतील. मॅप्सवर हे फीचर आधीपासूनच होते मात्र आता शॉर्टकट्स म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात युजर्सला याचा फायदा होईल.


युजर्सला यामध्ये जे रेस्टोरेंट टेकवे आणि डिलिव्हरी पर्याय देत आहेत, त्यांची यादी दिसली. अ‍ॅपमध्येच युजर्स फूड ऑर्डर करू शकतात. जर तुम्ही रेस्टोरेंटपर्यंत जाऊ शकत असाल तर टेकवे पर्याय निवडू शकता. मॅप्स उघडल्यावर युजर्सला कोव्हिड-19 ची देखील माहिती मिळेल.

Find out more: