इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी खास फीचर आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी एकच अकाउंट दोन फोनवर वापरता येणारे फीचर आणणार आहे.

 

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचे टेस्टिंग बिटा व्हर्जनवर होत आहे. या फीचरबाबतची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरला ट्रॅक करणारी वेबसाईट WABETEINFO ने दिली आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपचे हे खास फीचर आल्यानंतर फेसबुक, जीमेल आणि इंस्टाग्रामप्रमाणे एकच अकाउंट अनेक डिव्हाईसवर वापरता येईल. मात्र यामुळे प्राव्हेसीचा देखील धोका आहे. कारण अधिकतर लोक व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग खाजगी चॅटसाठी करतात. हे फीचर कधी रोल आउट होईल, याची मात्र अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.


https://mobile.twitter.com/WABetaInfo/status/1242555509888159744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242555509888159744&ref_url=https%3A%2F%2Fwww.majhapaper.com%2F2020%2F04%2F05%2Fcorona-virus-lock-down-google-maps-app-is-showing-two-new-shortcuts-takeaway-and-delivery%2F

Find out more: