लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉफ्रेंसिंग अॅप झूम चांगलेच लोकप्रिय झाले आहे. मात्र आता हे व्हिडीओ कॉन्फ्रेंससाठी सुरक्षित नसल्याने सरकारने म्हटले आहे. याशिवाय जे युजर खाजगी गोष्टींसाठी हे अॅप वापरू इच्छितात त्यांच्यासाठी नियमावली देखील जारी केली आहे. झूम अॅपच्या प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीवर वारंवार प्रश्न निर्माण झाले आहेत.
नियमावलीनुसार, झूम अॅपद्वारे कॉन्फ्रेंस रुममध्ये परवानगी शिवाय एंट्री होत आहे. त्यामुळे सेटिंग्समध्ये बदल करणे गरजेचे आहे. डीओएस अटॅक देखील पासवर्ड आणि एस्सेस ग्रँटमध्ये बदल करत रोखता येईल.
गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, झूम अॅपचे सर्व्हर टीकटॉकप्रमाणेच चीनमध्ये आहे. अॅपमध्ये अनेक गोष्टींची कमतरता आहे, याशिवाय अनेक संशयास्पद घटना समोर आल्या आहेत.
उद्योग, सरकार आणि महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांना गोपनीयता कायम राखायची आहे, त्यांनी या सॉफ्टवेअरचा वापर करू नये, असे सांगितले जात आहे.
याआधी भारतीय सायबर सिक्युरेटी एजेंसी सीईआरटीने देखील या अॅपच्या ब्रीचबाबत माहिती दिली होती. पासवर्ड लीक, व्हिडीओ कॉल हॅकिंगच्या घटना समोर आल्यानंतर या संदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.
गुगलने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना हे अॅप वापरण्यास मनाई केली आहे. या व्यतिरिक्त जर्मनी, सिंगापूर, तायवान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये देखील हे अॅप न वापरण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.