पुणे – शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींचे एनकाऊंटर केले. पोलिसांच्या एनकाऊंटरनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांच्या कारवाईचे काहीजणांनी कौतुक केले आहे तर चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचे काहींनी म्हटले आहे.
याप्रकरणातील आरोपी हे खरे होते की नाही, हे न्याय पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होत असल्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे मत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.
या एनकाऊंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून असा एनकाऊंटर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना कसा होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर शंका येते. वेळीच कारवाई ज्यांनी केली नाही, त्याचबरोबर ज्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही अशा सगळ्यांवर कारवाई होऊ शकते.
म्हणूनच हा यावर पडदा टाकण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो. केंद्राने हे एनकाऊंटर केले कि घडवले याची चौकशी करायला हवी. हे सर्वकाही जे घडले त्यावर पडदा टाकण्यासाठी केले गेले का?, असा सवाल विचारत नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.