जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत असून या व्हायरसमुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. त्यातच आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिंच्या यादीत स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली.
स्पेनचे राजे फिलीप IV यांची चुलत बहिण आणि बॉरबॉन-पार्मीच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे शनिवारी कोराना व्हायरसमुळे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. कोरोनाच्या राजघराण्यातील मारिया पहिल्या बळी ठरल्या. मारिया मागील तीन दिवसांपासून व्हेटीलेटरवर होत्या.
मारिया यांचे बंधू राजकुमार एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली. येत्या शुक्रवारी मारिया यांच्यावर माद्रिद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मारिया यांनी पॅऱिसमध्ये अखेरचा श्वास घेतला.